Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“संस्कार, सेवा आणि संस्कृती – संजय शिरसाठ यांची ओळख खरी”


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश  जळके

रक्षाबंधनासारख्या पवित्र भारतीय सणात समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेबांनी पुन्हा एकदा भारतीय संस्कृती आणि परंपरेचे औचित्य साधत, आपल्या मतदार संघातील बहिणींना राखी बांधून व औक्षण करून स्नेहबंध अधिक दृढ केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या मुलगी हर्षदासह त्यांनी हा सोहळा उत्साहात साजरा केला.


संपूर्ण आयुष्यभर समाजासाठी धावपळ करणारे, भारतीय संस्कृतीचे जतन करणारे आणि परंपरा पुढे नेणारे संजय शिरसाठ यांनी बहिणींच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.


"ज्याच्या हृदयात माणुसकीचा दीप उजळतो,

आणि संस्कृतीचा ध्वज आकाशात फडकतो,

तोच खरा समाजाचा आधार बनतो."



शिरसाठ यांची सामाजिक कार्यातली सक्रियता, भारतीय सण-उत्सवांमध्ये घेतलेली सहभागाची आस्था, आणि समाजबंध दृढ करण्याची अखंड प्रेरणा हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे मतदारसंघात सामाजिक एकता आणि परंपरेचा वारसा अधिक मजबूत होत आहे.



Post a Comment

0 Comments