अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड.प्रतिनिधी दि. (1/8/2025) बालसभा म्हणजे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या बालमनावर सुसंस्कार व्हावेत यासाठी कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयांमध्ये आज लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने इ. 3री च्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन केले होते.
या बाल सभेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यार्थी विक्रांत माळोदे, प्रमुख अतिथी कु. प्रियंका खंदारे, प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी, विभाग प्रमुख रागिनी जोशी ताई, बाल सभा प्रमुख सुवर्ण ताई खानापूरकर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व मान्यवर व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांचे सहर्ष स्वागत करून बालसभेत सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी ओम गीतखाने याने केले व बालसभा म्हणजे काय व त्याची उद्दिष्ट उपस्थितांना सांगितले.
यावेळी विद्यार्थी भाषण इ. 1 ली शिवण्या टिंगळे, इंद्रायणी मुळे, इ 2 री गुंजन मस्के,श्रीराज शेटे,अनया भाकरे,इ. 3री स्वरा गिरी,ओम गीतखाने,ओम वावरे,तृप्ती घोडके, रूपा जाडकर, इ 4थी अर्पिता तांबे, समर्थ पठाडे, ब्राह्मणी जानवे,स्वरूप मुळे,वैष्णवी बारहाते,पुनम सोनवणे,शिवकन्या भोसले,वैष्णवी चोथे, भूमी वाघ,श्रद्धा पिंगळे,अर्पिता लिहिणार,अदिती राठोड यांनी सादर केली.
यावेळी प्रमुख अतिथी विद्यार्थिनी प्रियंका खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप विद्यार्थी विक्रांत माळोदे यांने केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांवर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने अचूक सादर केली.
या बालसभेच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक सुवर्णलता खानापूरकर व गणराज जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी पद्य गीत सादर विद्यार्थिनी स्वरा गिरी व आरोही डोंबे यांनी केले.
या विद्यार्थी बाल सभेचे सूत्रसंचालन विद्यार्थी अर्पित गव्हाणे व ऋणनिर्देश विद्यार्थी रुद्रा जाडकर यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक प्रदीप जोशी यांनी सर्व भाषण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोड कौतुक केले. व बालसभेचे उत्कृष्ट नियोजन केले याबद्दल मत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल सभेची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.

Post a Comment
0 Comments