Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चंदनझिरा पोलीसांची संयुक्त कारवाई – उत्तर प्रदेशातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध, दोन आरोपी जेरबंद

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

चंदनझिरा –उत्तर प्रदेशातील मैनपुरी (आग्रा विभाग) येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना चंदनझिरा पोलीस ठाणे आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले.

दिनांक 09 जुलै 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाणे, मैनपुरी येथे पोलीस उपनिरीक्षक ध्रुव सिंह लखन सिंह यांनी गुन्हा क्रमांक 506/2025 अंतर्गत कलम 137(2), 37 भा. न्या. संहिता 2023 नुसार तक्रार दाखल केली होती. फिर्यादीनुसार, आरोपी आयाज अन्सारी, मकसूद अन्सारी आणि फैजान अन्सारी (सर्व रा. गोलाबाजार, मैनपुरी) यांनी अल्पवयीन मुलीस फुस लावून बळजबरीने पळवून नेले होते.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चंदनझिरा पोलीस उपनिरीक्षक मारियो स्कॉट यांच्या नेतृत्वाखाली, बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, नियोजनबद्ध गुप्त कारवाई करत चंदनझिरा परिसरात आरोपी फैजान मकसूद अन्सारी आणि आयाज मकसूद अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत दोन्ही आरोपींसोबत पळवून आणलेली अल्पवयीन मुलगीही सापडली.

यानंतर, दोन्ही आरोपी व अल्पवयीन मुलीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोतवाली पोलीस ठाणे, मैनपुरी येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजय बंन्सल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक मारियो स्कॉट, पोउपनि. रवि देशमाने, पोहेकॉ राजेंद्र ठाकुर, कृष्णा तंगे, मपोहेकॉ सिधुं खरजुले, जया जैस्वाल, चालक पोहेकॉ काकासाहेब बोटवे तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार, गिरेंद्र सिंह व शैलेंद्र सिंह यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments