शिवसेना ( शिंदे गट)चे राहुल व्ही व खरात, शरद राठोड यांच्या मध्यस्तीने सुटका
सविस्तर वृत्त असे अंबड तालुक्यातील पानेगाव येथील मूळचे रहिवासी असणारे विजय तूपसोंदर, रा जालना, यांची मुलगी अश्विनी विजय तुपसोंदर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील तुपसोंदर चे जावई सचिन हातागळे , यांनी गेल्या वर्षी गेवराई तालुका येथील ऊसतोड मुकादम यांच्याकडून उचल म्हणून दीड लाख रुपये घेतले होते, परंतु त्यावेळेस सचिन हातागळे हा काही कारणाने ऊसतोड काम करण्यासाठी गेला नाही, त्यानंतर काही महिन्यांनी गेवराई तालुक्यातील ऊसतोड मुकादम यांनी सचिन हातागळे आणि त्याची पत्नी अश्विनी हातागळे यांना आपल्या ताब्यात गेवराई मधील एका ठिकाणी ठेवले , मुकादम यांचा त्याच परिसरात हॉटेल ढाबा होता त्या हॉटेलवर सचिन हातागळे हा गेल्या काही महिन्यापासून काम करत होता, त्याची पत्नी ही त्याच्याजवळ दोन मुलीसह त्या ठिकाणी राहत होती, यावर्षी सचिन हातागळे आणि त्याची पत्नी अश्विनी हातागळे यांना ऊस तोडी करण्यासाठी कारखान्यावर घेऊन जायचे आहे, त्यामुळे त्यांना मुकादम तिथून कुठेही हालचाल करून देत नव्हता गेल्या सहा महिन्यापासून त्यांना तिथेच ठेवण्यात आले होते. हॉटेल मधून काम करून सचिन हातागळे हा थोडे थोडे पैसे मुकादम यांचे आजपर्यंत परतफेड करत होता, सचिन यांची पत्नी अश्विनी हि गर्भवती असून तिला आठवा महिना सुरू आहे , मुकादम यांनी आपल्या ताब्यात ठेवून त्या ठिकाणाहून हालचाल करून देत नसल्यामुळे अश्विनी हातागळे हिचा गर्भवती असल्याच्या कोणत्याही उपचार अद्याप घेण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसापूर्वी अश्विनी हिचे वडील विजय तूप सुंदर आणि आई आपल्या काही कुटुंबासहित गेवराई तालुक्यातील राज पिंपरी सासुरवाडी ढाब्या जवळ मुका दमाने ठेवलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले असता मुलीची डिलिव्हरी झाल्यावर आम्ही परत मुलीला आमच्या जावयासोबत ऊसतोड करण्यासाठी पाठवू सध्या मुलीला उपचार घेण्यासाठी आमच्या ताब्यात द्या अशी विनंती कुटुंबाने केली त्यावर मुकादम यांनी अश्विनी हिला तुमच्या ताब्यात देत नाही आणि तिला मी ऊसतोड करण्यासाठी घेऊन जाणार आहे, यावर कुटुंबातील लोकांनी सांगितले की आमचे जावई सचिन हातागळे यांना तुम्ही ऊसतोड करण्यासाठी घेऊन जा आणि तसे आमचा जावई ही येण्यासाठी तयार आहे, परंतु मुकादम हा काही केल्या त्या दिवशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. घडलेला हा सर्व प्रकार पानेगाव येथील अमोल भालेराव यांनी अंबड येथील शिवसेनेचे युवा नेते राहुल ही खरात यांना सांगितला त्यावर दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी शिवसेनेचे राहुल ही खरात तसेच शिवसेनेचे युवा नेते शरद भाऊ राठोड यांनी अंबड येथून आपल्या सहकार्यासोबत अश्विनी हातागळे यांच्या आई वडिलांना सोबत घेऊन गेवराई येथे जाऊन, मुकादम यांची भेट घेतली त्यांना सविस्तर वस्तुस्थिती समजून सांगितली की अश्विनी हिला गर्भवती असल्याने उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे, वेळीच जर उपचार घेतले नाही तर अश्विनी हिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून उपचार घ्यावेच लागतील. म्हणून तुम्ही काही महिन्यांसाठी अश्विनी हिला तिचे वडील विजय तूपसंदर यांच्या ताब्यात द्या. आणि त्यांचे जावई सचिन हातागळे यांना ऊसतोडीसाठी घेऊन जा असे समजून सांगितले. सर्व परिस्थिती मुकादम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन अश्विनी आणि तिची दोन वर्षाची मुलगी हिला सुखरूप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आली .गेवराई रुग्णालयात जाऊन अश्विनी यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ऊसतोड मुकादम यांचेही आर्थिक नुकसान होऊ देणार नाही असे त्यांना आश्वासन शिवसेनेचे युवा नेते राहुल ही खरात,शरद भाऊ राठोड यांनी दिले.

Post a Comment
0 Comments