Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"सड़क पे शराब, और निगाहें ख़राब"

 




जालना-अंबड महामार्गावर, विशेषतः शेवगा पाटी भागात, दारूचा धंदा पोलीसांच्या सावलीत फुलत आहे आणि मुलींचं भवितव्य वाळवंटात सुकतंय.

धनगर पिंपरी, शेवगा, सारंगपूर, हरतखेडा, वाघलखेडा, हस्तपोखरी, कर्जत या गावांची ही बाजारपेठ आता दारूच्या गंधाने आणि गुन्हेगारीच्या वाऱ्याने भरली आहे.

"दारूच्या नशेत डोळे लाल होतात,

आणि संस्कारांचे दिवे विझून जातात…"

दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या मुलींच्या वाटेत छेडछाड, अडवणूक आणि अश्लील बोलणी हा आता रोजचा कार्यक्रम झालाय. दारू पिऊन रस्त्यावर थांबलेले लोक मुलींना अडवतात, चिडवतात आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर करतात.

"तुम्ही दुकान उघडलंय पापाचं,

आम्ही तर स्वप्न उघडायचं ठरवलं होतं…"

अनेक पालकांनी मुली शहरात शिक्षणासाठी पाठवणं थांबवलंय. परिणामी, अनेक मुलींचं शिक्षण अर्धवट थांबतंय. महिलांनाही घराबाहेर पडताना दारूच्या व्यसनात बुडालेल्यांची भीती सतावत आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोर हा धंदा सुरू असूनही कारवाईचा आवाजही नाही. नागरिकांचा आरोप – ही शांतता म्हणजे मूक संमती.

"जेव्हा पोलीस झोपतात,

तेव्हा गुन्हेगार पार्टी करतात…"

परिसरातील महिलांनी आणि पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे – तातडीने कारवाई न झाल्यास मुलींच्या शिक्षणावर आणि भवितव्यावर अंधार कायमचा पडेल.

Post a Comment

0 Comments