अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना जिल्ह्यात व परतुर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत १३ चोरीच्या महागड्या मोटारसायकलींसह तीन आरोपींना अटक केली असून, एकूण ९.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही विशेष कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. एस.बी. भागवत यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने पार पाडली आहे.
तांत्रिक विश्लेषणातून गुन्हेगार गजाआड दिनांक 01/08/2025 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, परतुर-वाटूर रोडवरील बालाजीनगर परिसरात हॉटेल मोक्षसमोर काही इसम मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीतील असल्याची शक्यता आहे. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मौजे लिंगसा येथील विष्णू दादाराव माने (२०) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वैभव ज्ञानेश्वर धरपडे (२१) व सुभाष उर्फ राजेश प्रभाकर जाधव (२५) यांची माहिती दिली.
त्यांच्या कब्जातून Honda Shine (७), Hero HF Deluxe (३), Passion Pro (१), Splendor+ (१) अशा एकूण १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांची अंदाजे किंमत ९,४०,००० रुपये इतकी आहे.
चोरीचा व्याप फक्त परतुरपुरता नाही – जालना, बीड, संभाजीनगर जिल्ह्यांपर्यंत गुन्हे विस्तारलेले!
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून कारवाई यशस्वी
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक एस.बी. भागवत, पोउपनि अमोल रावते, तसेच अंमलदार धर्मा शिंदे, किरण मोरे, गजानन राठोड, विजय जाधव, भागवत खाडे, नरेंद्र चव्हाण, दशरथ गोपनवाड, सॅम्युअल गायकवाड, पवनकुमार धापसे आणि आय.टी. सेलचे सागर बाविस्कर यांचे विशेष योगदान आहे.

Post a Comment
0 Comments