अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
साहित्य, समाजसुधारणा आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणारे थोर विचारवंत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत कार्यालय बदनापूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष मा. विलास जराड, गटनेते बाबासाहेब कराळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल चाबुकस्वार, स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे, डॉ. सदाशिव गायकवाड, शशिकांत कांबळे, नगरसेवक एकबाल भारमाई, आवास घरकुल योजनेच्या प्रकल्पातील कर्मचारी दीपिका सुरवाडे मॅडम, नगरपंचायत कर्मचारी दिगंबर मुळे सर, मिलिंद दाभाडे आदींच्या उपस्थितीत हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांनी आपल्या साहित्यिक कार्यातून मजुरांचा, वंचितांचा आवाज बनून समाजमनाला जागवले, हे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायत बदनापूर यांनी केले असून, सर्वच घटकांमधून या अभिवादन उपक्रमाचे कौतुक
होत आहे.

Post a Comment
0 Comments