Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्वर्गीय विलास दादा लांडे यांच्या समाजसेवेच्या स्मृती जागवणारा १२ वा भव्य भंडारा; भाविकांनी घ्यावा महाप्रसादाचा लाभ

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


अंबड येथील प्रसिद्ध डोंगरा वरील महादेव मंदिरात यंदा १२ वा भव्य भंडारा आयोजित करण्यात आला आहे. हा भंडारा स्वर्गीय विलास दादा लांडे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तीभावाने पार पडणार आहे.


स्वर्गीय विलास दादा लांडे हे केवळ समाजकारणातच नव्हे तर गरजूंसाठी सदैव धावून जाणारे, लोककल्याणाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावला. गरीब, वंचित आणि शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झटत समाजात आदर्श निर्माण केला.


त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्रमंडळाने सुरू केलेला हा भंडारा आज भक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक बनला आहे. चर्थिक मित्र परिवाराच्या वतीने होणाऱ्या या आयोजनात भाविकांना प्रसादाच्या माध्यमातून समाजबंध दृढ करण्याची संधी मिळते.


आयोजक मंडळाच्या आवाहनानुसार, सर्व श्रद्धावान भाविकांनी या भंडाऱ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा व स्वर्गीय विलास दादा लांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करावे.

Post a Comment

0 Comments