अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गटसाधन केंद्र अंबडचे गटशिक्षणाधिकारी दिनेश शिनगारे,यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या 'चला अधिकारी घडवूया' या उपक्रमांतर्गत जि प प्रा शा ढालसखेडा येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या यशवंताच्या गुणगौरवाचा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभम जाधव, सरपंच मंगलताई जाधव , पोलिस पाटील अंबादास उबाळे , ग्रामसेवक प्रवीण पगारे, कर्तव्यदक्ष, विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक नितीन रोहोकले , सहशिक्षक दिलीप तौर , योगशिक्षक गजानन पुरी यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पवित्र पोर्टल मधून माध्यमिक शिक्षक पदावर रुजू झालेले रामेश्वर किसनराव जऱ्हाड, राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केल्या बद्दल डॉ योगेश्वर रामेश्वर गोळे, डॉ शुभम कृष्णा गोळे, कामगार विभागात नियुक्त झालेले विकास गयादास जाधव, बी एच एम एस शिक्षण घेत असलेल्या डॉ प्रिया प्रभाकर मुजगुले , डॉ युवराज हरिभाऊ फुके तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सलमान पठाण यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील या यशवंतांचा तसेच गावातील तलाठी कृष्णा मुजगुले , प्रकाश गोळे, पोलिस उपनिरीक्षक भगवान मुजगुले यांचा आदर्श समोर ठेवत चांगला अभ्यास करण्याचे आवाहन मुख्याध्यापक नितीन रोहोकले यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळविलेल्या यशवंताचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी दिनेश शिनगारे, केंद्रप्रमुख अमोल कुलकर्णी, बाळाभाऊ जाधव, शत्रुघ्न जऱ्हाड, आत्माराम उबाळे, प्रभाकर मुजगुले नारायण गोळे, भिकाजी चव्हाण, अन्वर पठाण , बळीराम गोळे, बळीराम मुजगुले , गणेश जऱ्हाड , अंगणवाडी सेविका रुख्मिन फुके, मीना उमप, कुशीवर्ता उबाळे , भाडळकर ताई तसेच ग्रामस्थ ढालसखेडा यांनी यशवंताचे अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments