साष्टपिंपळगाव : अबंड तालुक्यातील भांबेरी येथे स्वातंत्र्यदिना निमित्त सुट्टीवर आलेल्या सिमा सुरक्षा दलातील सैनिकाच्या हाताने ध्वजारोहन करण्यात आले.
याबाबत अधिक माहीती अशी की भांबेरी येथे स्वतंत्र्य दिनानिमीत्त ग्रामपचांयत कार्यालय व जिल्हा परीषद प्राथामिक शाळा येथे सरपंच व शालेय समिती अध्यक्ष्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते मात्र यावर्षी सिमा सुरक्षा दलातील परसराम मुरलिधर केजभट हा सुट्टीनमित्त गावी आलेला आहे तसेच क्रुष्णा नवनाथ केजभट हा मराठा लाईट इन्फट्री कोलकाता येथे कर्तव्य बजावत आहे तो सुद्धा सुट्टी निमित्त गावी आलेला आहे म्हणुन भांबेरीचे सरपंच सपना अन्नासाहेब कनके व शालेय व्यवस्थापन समीतीने सर्वानुमते असा निर्णय घेतला की यावर्षीये ध्वजारोहन या दोन्ही सैनिकाच्या हस्ते करण्याचा करण्यात यावे.
यावेळी परसराम मुरलिधर केजभट ( सिमा सुरक्षा दल ) याच्या हस्ते ग्रामपचांयत कार्यालय मधे ध्वजारोहण करण्यात आले तर क्रुष्णा नवनाथ केजभट( स्थल सेना ) यांच्या हस्ते जिल्हा परीषद प्राथामिक शाळेमधे ध्वजारोहण करण्यात आले . भांबेरी ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परीसरामधुन कौतुक होत आहे .
अडभंगनाथ माध्यमिक विद्यालयामधे देखिल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी सरपंच सपना अन्नासाहेब कनके , भाउसाहेब कनके ,सजंय कनके ,सहदेव भारती ,रजनिश कनके,अन्नासाहेब कनके ,अशोक केजभट धनजंय केजभट, परमेश्वर कनके , काकासाहेब कनके , केदारनाथ तरमाळे राजेंद्र कनके,सचिन कनके , मुख्याध्यापक गिरी, श्री पाटील सर , परमेश्वर ठोबंरे ,हरीभाउ कनके,बाबामिया शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते

Post a Comment
0 Comments