Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा





अंबळ वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

 कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिनानिमित्त भा. शि. प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य ॲड. रोहितजी सर्वज्ञ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भा. शि. प्र. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. ज्योती भाभी ठाकूर, श्री व्यंकटेशजी गोसावी (अध्यक्ष स्था. व्य. स.), श्री केदारजी मंत्री (कार्यवाह स्था. व्य.स),शाळेचे सदस्य डॉ. राजेंद्रजी भाला, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, अर्थ समिती अध्यक्ष रमेश भाऊ बुंदेलखंडे , श्री अंबादासजी अंभोरे , गोरख चोथे उपस्थित होते. 


                या कार्यक्रमात ॲड .रोहितजी सर्वज्ञ यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्याचे सांगितले. भारत सध्या महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून देशात महिला सक्षमीकरण, विज्ञान, क्रीडा , हस्तकला या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी देश महासत्ता होण्यासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

             श्री अंबादासजी अंभोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगितले भारत मातेला उच्च स्थानी बसवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

                 अध्यक्षीय समारोपात सौ. ज्योतीभाभी ठाकूर यांनी संस्थेतील प्रत्येक शाळेला संस्कार केंद्र का म्हटले जाते याबद्दल माहिती दिली. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन पैसे कमावणे एवढे मर्यादित नसून प्रत्येक विद्यार्थी हा संस्कारक्षम आदर्श नागरिक झाला पाहिजे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीच्या अनुसरण केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

          या कार्यक्रमात माजी विद्यार्थी वल्लभ विश्वंभर कुलकर्णी ,आरती कैलास पिराणे या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

              विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

             इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक नितेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत सादर केली.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - आम्रपाली बोराळे तर आभार प्रदर्शन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर घायतडक यांनी केले. 

वैयक्तिक पद्य - सुवर्णलता खानापूरकर, पसायदान- रेखा देशमुख सादर केले. या कार्यक्रमात शिशुवाटिकेतील विद्यार्थी विविध क्रांतिकारकाच्या वेशभूषा करून आले होत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments