अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड : भाजपचे तेलंगणातील आमदार रामराव (पाटील) पवार यांनी नुकतीच ऐतिहासिक भद्रा मारुती मंदिरात भेट देऊन पूजा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुख-समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
सध्या शेतीत अनेक समस्या आहेत, ज्यामुळे शेतकरी संकटात आहेत. या परिस्थितीवर मात करून त्यांच्या जीवनात भरभराट यावी, असे साकडे आमदार पवार यांनी मारुतीला घातले.
आमदार पवार यांच्या या अचानक भेटीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांना भेटण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
अंबडमध्ये पत्रकार बळीराम राऊत, आकाश जळके, गोविंद खरात, ज्ञानेश्वर सोळुंके आणि सुदर्शन नागरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या भेटीमुळे, आमदार रामराव पवार हे केवळ राजकारणी नसून, शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल संवेदनशील आणि भावनिक असल्याचे दिसून आले. त्यांचे हे वेगळेपण स्थानिक लोकांमध्ये चर्चेचा वि
षय ठरले.



Post a Comment
0 Comments