Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबडमध्ये राठी डिपार्टमेंटलचे बांधकाम संशयाच्या भोवऱ्यात – “नियम गरीबांसाठी वेगळे, श्रीमंतांसाठी वेगळे का?” घोलपांचा सवाल

 



अंबड दि. १६ (प्रतिनिधी) :- अंबड शहरातील जालना-बीड रस्त्यावरील राठी डिपार्टमेंटल व रेडीमेड कपड्याचे दुकान तसेच घराचे बांधकाम हे परवान्यानुसार झाले नसल्याचा गंभीर आरोप सुज्ञ नागरिक बाबासाहेब घोलप यांनी केला आहे.

सदर बांधकाम अधिनियमाअंतर्गत वैध नसेल तर तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घोलप यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पूर्वीही तक्रार दाखल केली होती; मात्र आजपर्यंत चौकशीच झाली नाही. त्यामुळे, “आठ दिवसांत कारवाई न झाल्यास मी उच्च न्यायालयात धाव घेईन”, असा इशारा घोलप यांनी दिला आहे.

आपल्या निवेदनात घोलप यांनी म्हटले आहे की – “नगर परिषदेचे बांधकाम नियम हे गरीबांसाठी एक आणि श्रीमंतांसाठी दुसरे का? गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर व्यावसायिक गाळे उभे करून राठी डिपार्टमेंटल सुरू आहे. बांधकाम परवाना व प्रत्यक्ष बांधकाम यामध्ये तफावत असून, तीन ते चार मजली इमारतीमुळे कायद्याचा उघड उघड उल्लंघन झालेले आहे.”

या प्रकरणाची प्रत नगरविकास मंत्री, पालकमंत्री जालना, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर तसेच जिल्हाधिकारी जालना यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments