अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश शेळके
अंबड (प्रतिनिधी): अंबड तालुक्यात ‘महसूल सप्ताह’ निमित्ताने दिनांक 30 जुलै 2025 पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने नागरिकांना थेट लाभ मिळावा यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे.
या सप्ताहात ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, महसूल सप्ताह कालावधीत अंबड तालुक्यात एकूण 545 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये 232 प्रकरणांचे पुनर्विलोकन (Revalidation) करून नोंदवहीतून अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 313 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय, खालील उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले:
संजीव गांधी निराधार योजना: या योजनेतून लाभार्थ्यांच्या याद्यांची पुनर्रचना करण्यात आली.
शेती भूधारक अद्ययावत योजना: 23 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जमाबंदी दुरुस्तीबाबत मदत: जमाबंदी दुरुस्तीमुळे अडचणीत आलेल्या पशुपालकांना मदत मिळाली.
स्तर निर्धारण प्रकरणे: एकूण 15 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली.
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला वेगाने आणि कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी महसूल विभाग कार्यरत आहे. या मोहिमेमुळे शेतकरी, भूमिहीन, वृद्ध, महिलांना मोठा दिलासा मिळत आहे. तहसील कार्यालयात रोज विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करत आहेत.
या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास दुणावला असून, महसूल सप्ताहाचे सकारात्मक पडसाद
तालुकाभर उमटत आहेत.
Post a Comment
0 Comments