अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
सुखापूरी ग्रामपंचायतीत महसूल विभागाच्या वतीने ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात आला. गावातच शासकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, अनेक नागरिकांनी विविध प्रमाणपत्रे आणि दाखले तात्काळ प्राप्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळ अधिकारी व्ही. बी. जायभाये, तलाठी कृष्णा देशमुख, ज्योती माने, सरपंच भगवानराव राखुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महसूल विभागाच्या विविध सेवा – डिजिटल सातबारा, उत्पन्न-जात-निवासी दाखले, ई-हक्कपत्रिका यांची माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष सेवा देण्यात आल्या.
मंडळ अधिकारी जायभाये यांनी सांगितले की, "नागरिकांना घरपोच सेवा देणे हे महसूल विभागाचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ केली जात आहे." तर तलाठी माने यांनी डिजिटल सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही तक्रारी किंवा अडचणी त्वरित नोंदवून त्याचे तत्काळ निराकरण करण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण तयार झाले.
उपस्थित मान्यवर :
व्ही. बी. जायभाये (मंडळ अधिकारी), कृष्णा देशमुख (ग्राम महसूल अधिकारी), अक्षय देशमुख, सतीश शिंदे, ज्योती माने, पवन तुपकर, ए. बी. पठाण, सखाराम सातभद्रे, दीपक पटेकर, गजानन शिंदे, रशीद बागवान, संदीप राखुंडे, भगवान ढवळे, बाबू तांबोळी, मोईन तांबोळी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments