Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेवगा ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

 



शेवगा (प्रतिनिधी):दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मौजे शेवगा, ता. अंबड, जि. जालना येथे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य जगनाथ गणेश तिकांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास गावचे सरपंच शंकर गायकवाड, उपसरपंच संकेत खरात, सदस्य सतीश गाढे, रामेश्वर गाढे, रामनाथ तळपे, इसाखान पठाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अकबर पठाण, शालेय समिती अध्यक्ष सादिक पठाण, पोलीस पाटील ईश्वर वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी सुदर्शन नागरे, पांडुरंग तिकांडे तसेच ग्रामरोजगार संघटनेचे अंबड तालुका अध्यक्ष मनोहर भाऊ खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.


ही माहिती जालना जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन संभाजी नागरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments