अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड: येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश शाळेच्या १४ वर्षाखालील वयोगटातील खेळाडू शिवराज खैरे, ध्रुव तिकांडे व अजित उखळकर तसेच १७ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये स्मृती धाईत ,१९ वर्षाखालील मुलींमध्ये दिव्या खैरे व मुलांमध्ये जाधव शिवराज विजयी ठरला. अशा प्रकारे मुले व मुलींच्या बुद्धीबळ संघाने अंबड येथे झालेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत बुद्धीबळ संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. या विजयी संघाचे शाळेचे अध्यक्ष डॉ .प्रवीणकुमार कासलीवाल डॉ. रमेशचंद्र गंगवाल, शिरीष सावजी, प्रवीण बाकलीवाल, संजय चांदीवाल, सुरेश दिडपोळे, डॉ. राजेंद्र काला, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ.संतोष मोहळे, चंद्रप्रभू दिडपोळे, संजय इंचूरे, मुकेश सावजी, संतोष बाकलीवाल, दिपक पाटणी, भूषण काला, डॉ. अनिल पांडे, दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज,क्रीडा शिक्षक नागेश वराडे, हरिश्चंद्र जरांगे, सौ.आराधना मुंगीकर यांच्यासह सर्व शिक्षक, पालक यांनी विजय संघाचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments