अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे
अंबड : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अंबड पोलिसांनी आज (३१ ऑगस्ट) रूट मार्च काढला. यावेळी पोलिसांची शिस्तबद्ध तुकडी शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरली.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जातात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज पोलीस ठाणे अंबड अंतर्गत शहराच्या विविध भागांतून रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च पठाण मोहल्ला, नाथ्रेकर चौक, महाराष्ट्र वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि येथील दुरक्षेत्र पोलीस चौकीपर्यंत काढण्यात आला. यामध्ये ६ अधिकारी, ५७ पोलीस अंमलदार आणि २७ होमगार्ड सहभागी होते.
या रूट मार्चचा उद्देश जनतेला सुरक्षिततेची खात्री देणे आणि समाजकंटकांना जरब बसवणे हा होता. पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना पोलिसांनी सांगितले की, नागरिकांनी कोणताही गैरसमज न बाळगता सण-उत्सव शांततेत साजरे करावेत. पोलीस २४ तास जनतेच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी सज्ज आहेत.
अंबडमध्ये पोलीस दल सज्ज, गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

Post a Comment
0 Comments