घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी):
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हंस फाउंडेशनच्या वतीने यंदा जिल्हास्तरीय ‘उत्कृष्ट गणपती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांपैकी सर्वोत्कृष्ट मंडळाचा सन्मान करण्यात येणार आहे. सहभागासाठी इच्छुक गणेश मंडळांनी एका विशेष लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार सर्व मंडळांची पाहणी व परीक्षण केले जाणार असून सजावट, सामाजिक संदेश, स्वच्छता तसेच पर्यावरणपूरक उपक्रम या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन करण्यात येईल. या कठोर परीक्षणातूनच सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाची निवड होणार आहे. या स्पर्धेद्वारे सामाजिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देणे हा हंस फाउंडेशनचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. नोंदणी व स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 9637754952 आयोजकांशी संपर्क साधावा, तसेच जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्पर्धेला प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments