अंबड (प्रतिनिधी – आकाश जळके):
नुकत्याच अंकुशनगर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ओमकार गरड याची (14 वर्षे वयोगटात) लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
तसेच माध्यमिक विद्यालयातील राजनंदिनी खरात (लांब उडी) व प्राथमिक विद्यालयातील तन्वी जाधव (लांब उडी) यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षक गजानन उबाळे, अनिल चव्हाण व लक्ष्मीकांत सामग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलूरकर, उपाध्यक्ष सौ. ज्योतीभाभी ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांतजी मुळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वेंकटेशजी गोसावी, कार्यवाह केदारजी मंत्री, शालेय समिती अध्यक्ष ॲड. सदाशिवराव उपाध्ये, श्री श्रीपादजी जपे, डॉ. राजेंद्रजी भाले, श्री तुकारामजी तौर, श्री रमेशभाऊ बुंदेलखंडे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री सुधाकरजी घायतडक, प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदीपजी जोशी तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
📌 “विद्यार्थ्यांच्या यशामुळे शैक्षणिक संकुलाचा लौकिक वाढला असून पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Post a Comment
0 Comments