Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महसूल सप्ताहात वृक्षारोपण आणि जनजागृती — नोंदणी विभागाच्या योजनांना मिळतोय उत्तम प्रतिसाद!

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड (दि. ६ ऑगस्ट २०२५):

महसूल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाअंतर्गत आज अंबड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तहसीलदार श्री. विजय चव्हाण यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी सह दुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांनी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. लिपिक मदन वैष्णव, स्वाती जगधने, पत्रकार सतीश देशपांडे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी देण्यात आलेली महत्त्वाची माहिती:

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2025 व सलोखा योजना यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शेतजमिनीच्या अदलाबदल प्रक्रियेसाठी केवळ ₹1000 मुद्रांक शुल्क व ₹1000 नोंदणी शुल्क आकारण्यात येणार.

"एक जिल्हा – एक नोंदणी कार्यालय" ही योजना 1 मे 2015 पासून लागू – नागरिकांना कुठल्याही निबंधक कार्यालयात दस्त नोंदवता येणार.

महिला खरेदीदारांसाठी 1% मुद्रांक शुल्क सवलत.

शासकीय कार्यालय/न्यायालयात सादर होणाऱ्या प्रतांवरील मुद्रांक शुल्काची माफी.

भाडेकरारनामा 2.0 व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया – अधिक पारदर्शकता व सोयीसाठी.

मुद्रांक शुल्काचा परतावा आणि अभिनय प्रकरणांवर त्वरित निर्णयाची सुविधा.

दिनांक ४ ऑगस्ट रोजी महसूल मंडळ जामखेड येथे आयोजित कार्यक्रमात मा. आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण यांच्या उपस्थितीतही योजनांचे सविस्तर मार्गदर्शन झाले होते.

आजच्या वृक्षारोपण सोहळ्यात सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रविंद्र मुळें यांनीही या योजनांचा ला

भ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments