अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय! आता कोणताही वाहतूक पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी खाजगी मोबाईल फोनचा वापर करून वाहतुकीच्या नियमभंगाचे फोटो किंवा व्हिडीओ काढू शकणार नाही. याबाबत अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कडून 3 ऑगस्ट 2025 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
महत्वाचे मुद्दे:
खाजगी मोबाईलमधून फोटो/चित्रिकरण करण्यास स्पष्ट बंदी.
अधिकृत पोलिस यंत्रणाच (सर्व्हर लिंक असलेली प्रणाली) वापरण्याचे निर्देश.
नियमबाह्य कृत्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
गेल्या काही दिवसांत काही पोलिस कर्मचारी खाजगी मोबाईल वापरून वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे फोटो काढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या गोष्टीला आळा घालण्यासाठी व माहितीची गोपनीयता राखण्यासाठी, तसेच खाजगी वापराला प्रतिबंध घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सूचना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालय, वाहतूक विभाग, आणि पोलिस अधीक्षक कार्यालयांमध्ये तातडीने लागू करण्यात येणार आहे.
सुरक्षितता, गोपनीयता आणि पारदर्शकता यासाठीचा टप्पा – शासनाचा महत्त्व
पूर्ण पाऊल!


Post a Comment
0 Comments