Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"भगवाननगरात खरीप हंगाम जनजागृती; शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीचे प्रात्यक्षिक"

 


प्रतिनिधी /घोंगडे हातगाव

अंबड तालुक्यातील भगवाननगर येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पिकांवरील कीड व रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पावसाने उघडीप दिल्याने कीड व रोगांचा धोका वाढत असल्याने सुरक्षित फवारणी व कीटकनाशकांचा योग्य वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अशोक सव्वाशे यांनी कीटकनाशके, तणनाशके आणि विविध कृषी निविष्ठांचा योग्य हाताळणी व साठवणुकीबाबत महत्त्वाचे मुद्दे सांगितले. अविवेकी व जास्त प्रमाणातील फवारणी टाळावी, लेबल क्लेमनुसार औषधांचा वापर करावा, तसेच एकापेक्षा जास्त औषधे एकत्र मिसळण्याचे धोके याबाबत सविस्तर माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. विजय जाधव यांनी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ऊस या पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, फवारणीचे योग्य टप्पे आणि रिकाम्या औषधांच्या डब्यांची सुरक्षित विल्हेवाट याबद्दल मार्गदर्शन केले.

UPL कंपनीचे प्रतिनिधी श्री. रणजित मुंजाळ यांनी कापूस पिकावरील कीटकनाशकांबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन गोवर्धन उंडे (सहाय्यक कृषी अधिकारी, महाकाळा) यांनी केले. परिसरातील अनेक शेतकरी बांधव कार्यक्रमास उपस्थि

त होते.


Post a Comment

0 Comments