Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आओ गाव चले या उपक्रमांतर्गत महाआरोग्य शिबीर संपन्न

 



घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी): शहागड, अंकुश नगर, ता.१६-माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून इंडियन मेडिकल असोसिएशन, छत्रपती संभाजी नगर कडून आओ गाव चले या अभियानांतर्गत अंकुश नगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न.

  आपल्या धकाधकीच्या जीवन जगत असताना स्वतःच्या शरीराकडे लक्ष न दिल्याने गंभीर आजाराची लागण होऊ शकते, हे नाकारता येत नाही बदलत्या वयोमानामुळे वेळेत उपचार घेतल्यास आजार बरे होतात असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी केले. 

 राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आयोजित या उपक्रमांतर्गत अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे महाआरोग शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर, सेक्रेटरी डॉक्टर यशवंत गाडे ,आवो गाव चले उपक्रमाचे चेअरमन डॉक्टर शहाजी डॉक्टर,डाॅ. शिवाजी पोले, बालरोग तज्ञ डॉक्टर दत्ता कदम, डॉक्टर राजेंद्र चाकूरकर, डॉक्टर गीतेश दळवी ,डॉक्टर राजेंद्र शेवाळे, डॉक्टर गौरव साळवेसह उपस्थित होत.


   पुढे बोलताना टोपे म्हणाले डॉक्टरांचे समाजातील स्थान खूप मोठे आहे, त्यांचा अनेक वर्षाचा अनुभवाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुग्णांना सेवा देण्याचे काम डॉक्टर मंडळी कडून होत असते मागच्या काळामध्ये 12000 पेक्षाही अधिक रुग्णांचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन पुणे येथे देसाई हाॅस्पीटल मध्ये करण्यात आले.


 40 वर्षाच्या पुढील व्यक्तींनी वर्षातून किमान दोन वेळेस शरीराचे चेकअप केले पाहिजे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध मोफत योजनांचा फायदा घेऊन गंभीर आजारावरती उपचार करावे . असे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले . आओ गाव चले या महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण 938 विविध आजारग्रस्त रुग्णांनी तपासणी करून घेतली.


या रुग्णांनी केली तपासणी.

मेंदू विकार विभाग, ह्रद्यरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग,मुत्ररोग विभाग,पोटांचे आजार विभाग,,कान,नाक,घसा विभाग , सिटीस्कॅन, कॅन्सर विभाग, अंतःस्रावी ग्रंथी आजार विभाग, रेडिओलॉजी विभाग, त्वचारोग विभाग, बालरोग विभाग.


 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल लहाने यांनी केले.

यावेळी सरपंच दत्ता फुलझळके ,उपसरपंच आबासाहेब लहाने, माजी सरपंच मंगल कव्हळे ,संजय कव्हळे ,संतोष आदमाने, मुख्याध्यापक किशोर डावकर, तज्ञ डॉक्टर, संचालक, शिक्षक व परिसरातून आलेले रुग्न उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments