Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे-माजी मंत्री राजेश टोपे

 






अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

जायकवाडी धरण 95 टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने आज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 2 फुटाने उघडणार असून 37 हजार 728 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे असल्याचे कडाचे कार्यकारी अभियंता श्रीमती जगताप यांनी सांगितले.

गोदावरी नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सतर्क रहावे,नागरिकांनी गोदावरी नदीपात्रात जाऊ नये,विशेषतः अंबड, घनसावंगी, परतूर आणि पलीकडील माजलगाव, गेवराई भागातील गोदाकाठच्या गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी.घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे.मी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क रहाण्याबाबत जिल्हाधिकारी यांना बोलावून आदेश देणेबाबत सुचना केल्या आहेत.नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल,शेतीऔजारे,मोटारी,विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी,जनावरे यांना सुरक्षित ठेवावे.नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द,लहान मुलं,महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे.गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे गावकऱ्यांची काळजी घ्यावी.कोणाच्याही मालाची अथवा कोणतीही जीवित हानी होणार नाही,याची दक्षता घ्यावी.कुठलीही समस्या उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा असे आवहन *माजी मंत्री राजेश टोपे* यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments