अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशयातून आज दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.00 ते 8.30 या वेळेत अतिरिक्त विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
प्रकल्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक 10 ते 27 अशी एकूण 18 गेटे 2 फुटांवरून 2.5 फुटांपर्यंत उघडण्यात आली. त्यामुळे सांडव्याद्वारे पूर्वीच्या 37728 क्युसेक विसर्गासोबत आणखी 9432 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, एकूण 47160 क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे.
जलप्रवाहाचा वेग आणि आवक लक्षात घेऊन विसर्गात पुढे कमी-जास्त बदल होऊ शकतो, असे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक धोका न पत्करण्याची सूचना केली आहे.

Post a Comment
0 Comments