Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संघर्षाची ज्योत पेटती राहो” – पाथरवाला बु. येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

 



बातमी:पाथरवाला बु. (प्रतिनिधी – बंडु शिंगटे, घुंगर्डे हादगाव)

लोकशाहीर, समाज परिवर्तनाचे प्रखर पुरस्कर्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. सतीश घाटगे पाटील साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष आणि विचार समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. त्यांच्या संघर्षाची ज्योत प्रत्येकाच्या अंत:करणात प्रज्वलित राहिली, तर तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके, भाजप प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे, तालुका प्रमुख शिवाजी नाना मोरे, राजेंद्र छल्लारे सर, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिरुद्ध अण्णा झिंजुर्डे, भगवान दादा बर्वे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अण्णाभाऊ साठे यांच्या समाज परिवर्तनाच्या संदेशाने भारलेला हा सोहळा गावकऱ्यांच्या मनात प्रेरणेचा दीप पेटवून गेला.


Post a Comment

0 Comments