अंबड वार्ता/प्रतिनिधी आकाश जळके
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, आंबेजोगाई संचलित कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयात दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता 8 वी ते 10 वीतील एकूण 140 विद्यार्थ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांच्या शरीराच्या एकंदर प्रकृती, डोळे, त्वचा, पोषण, दात व इतर सामान्य आरोग्य समस्यांवर भर देण्यात आला. डॉ. अमोल जाधव आणि डॉ. कीर्तीजा तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी पार पडली. त्यांना फार्मासिस्ट छाया काकडे आणि सविता साबळे यांची मोलाची साथ लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर घायतडक, शिक्षक रेखा देशमुख, निशा जोशी, लक्ष्मीकांत सामग, गजानन उबाळे आणि शाम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्यासह आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments