Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात विस्तार सेवा कार्य अंतर्गत आरोग्य तपासणी



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

आरोग्य म्हणजे केवळ रोग नसणे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या उत्तम स्थिती असणे होय -डॉ. अमोल जाधव

प्रसारक संस्था संचलित कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालय सतत विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात काळजी घेत असते. देशाचे भावी नागरिक हे सुदृढ व आरोग्य संपन्न व्हावे याचा उपयोग त्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी होत असतो.

 कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयांमध्ये विस्तारसेवा कार्य समिती व उपजिल्हा रुग्णालय अंबड यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न झाली.



 या आरोग्य तपासणी मध्ये डॉ. अमोल जाधव, डॉ. कीर्तीजा तरटे सहकारी फार्मासिस्ट छाया काकडे, सविता साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी विस्तार सेवा कार्यप्रमुख राधेश्याम धोकटे, विभाग प्रमुख रागिनी जोशी, मारुती झाटे, सुवर्णलता खानापूरकर उपस्थित होते.

 विद्यालयामध्ये उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इ 1 ते 7 वी विभागातील 400 विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

 यावेळी वैद्यकीय अधिकारी अमोल जाधव व कीर्तीजा तरटे 

 म्हणाले की आरोग्य ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यात शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, आणि सामाजिक संबंधांचा समावेश होतो. चांगले आरोग्य विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामाला सक्षम बनवते आणि जीवनाचा दर्जा सुधारते. सर्व विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा. बाजारातील पॅकिंगचे पदार्थ खाणे टाळावे. विद्यार्थ्यांनी सकस आहार घेऊन आरोग्य संपन्न जीवन जगावे असा मोलाचा संदेश दिला.

 या आरोग्य तपासणीची सांगता कल्याणमंत्र्यांने करण्यात आली

Post a Comment

0 Comments