अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
उभाठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उभाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव चोथे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे.
अनेक वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यानंतर अचानक पक्षांतराचा निर्णय का घेतला जात आहे, हा प्रश्न आता मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
“सत्ता जिथे असते तिथेच निष्ठा किती काळ टिकते?” – हा प्रश्न राजकीय वर्तुळातही चर्चिला जात आहे.
🔹 जनतेत उमटलेले प्रश्न
एकनिष्ठ आमदार असूनही पक्ष सोडण्यामागचं नेमकं कारण काय?
कार्यकर्त्यांचा विश्वास आणि निष्ठा कोणत्या दिशेने वळणार?
सत्तेच्या समीकरणांसमोर विचारधारा कितपत ठराविक राहते?
मिळालेल्या माहितीनुसार, चोथे यांच्या सोबत उभाठा गटातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने मुंबई गाठून अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.
या प्रवेशामुळे उभाठा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेच्या गोटात मात्र या हालचालींमुळे संभ्रमाचे वातावरण आहे.

Post a Comment
0 Comments