शहागड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे अंतर्गत शहागड पोलिस चौकी येथे 20 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सव, व मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई मराठा आरक्षण मोर्चा चर्चा झाली.
यावेळी बोलतांना उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी सांगितले की मा. सर्वोच्च न्यायालयाच्या डीजे बंदी घालण्यात आलेली असून, कायद्याचे न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करू नका, अन्याथा सर्व पोलीस ठाणे येथे डिसिबल मशीन आलेले असून गाव व शहरी भागातील रहिवासी वस्त्यांमध्ये 55 डिसिबलच्या वर डीजे वाजल्यास ई-चलन मशीनद्वारे दंड करण्यात येईल तसेच आरटीओ यांना पत्र लिहून डीजे क्रमांका नुसार मालकावर परवाना रद्द करून साडेतीन लाखापर्यंत दंड होऊ शकतो.यासह यांची संपूर्ण जबाबदारी मंडळ अध्यक्ष्यावर राहील याची नोंद घ्यावी, मराठा आरक्षण साठी मुंबई कडे मोर्चा जात असल्याने खबरदारी व अंतरवाली सराटी ते अबंड तालुक्यातील हद्द संपेपर्यंत महामार्गावर कशाप्रकारे उपाययोजना करता येतील यासाठी पोलीस पाटीलांना विचारणा करून चर्चा करण्यात आली, तसेच गणेशोत्सव शांततेत व ईद पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांशी चर्चा केली. यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देताना, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आव्हान केले तसेच ओन्ली पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणीकृत फॉर्म भरून गोंदी पोलीस ठाणे येथे गोपीने शाखे जमा करावा असे सांगितले. नागरिकाच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आणि गोंदी पोलीस ठाणे अगदी पोलीस पाटलांशी संवाद साधला, एक गाव एक गणपती, सांस्कृतिक गणेश मंडळ, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबविण्याचे गणेश मंडळाला आव्हान करण्यात आले. कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास कायदेशीर कार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच ठाण्यातील 50 लोकांवर 107- 110 अन्वये कारवाई करण्याच्या आल्याची माहिती सांगितली. यावेळी शहागड गावाचे सरपंच रावसाहेब जोगदंड, उपसरपंच अरबाज तांबोळी, पोलीस पाटील इंद्रजीत पाटील डोमलगाव, इलियास बागवान सुखापुरी, तसेच गणेश मंडळाचे नवीन पदाधिकारी व मागील वर्षी स्थापन केलेल्या गणेश मंडळाचे सदस्य , उपनिरीक्षक हारिदास जंगले, फुलचंद हाजारे, रामदास केंद्रे
यांची उपस्थिती होती.


Post a Comment
0 Comments