प्रतिनिधी घुंगर्डेहदगाव बंडू शिंगटे
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील मत्स्योदरी विद्यालयात माता-पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मुख्याध्यापक कल्याण सोळुंके यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या युगात तरुणांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून वाईट व्यसनांना नाही म्हणावे. समाजात वावरताना आपले विचार मोठे ठेवावेत आणि आपली संस्कृती जपावी.
सोळुंके सरांनी पालकांना आवाहन केले की, शाळा सुटल्यानंतर मुलगा किंवा मुलगी वेळेत घरी पोहोचते का, अभ्यास करतो का, शिक्षकांनी काय शिकवले – याबाबत सतत संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाची जबाबदारी शाळेसोबतच पालकांचीही आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात शिक्षक वर्गाच्या अध्यापनातील समर्पणाची, विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि पालकांच्या सततच्या प्रेरणेची विशेष प्रशंसा करण्यात आली. यावेळी पालक, शिक्षक आणि शाळेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments