‘बंध प्रेमाचे, संस्कार ज्ञानाचे’ – कै. दत्ताजी भाले विद्यालयात राखी उत्सव जल्लोषात
अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड – कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राखी बांधून बंधुभावाची गोड नाती घट्ट केली. तसेच शिक्षिकांनी शिक्षकांना राखी बांधून परंपरेला मान दिला.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना प्रेमाचे व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू अर्पण केल्या. कार्यक्रमात शिक्षक लक्ष्मीकांत सामग आणि गजानन उबाळे यांनी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना परंपरांचे मोल आणि भावबंधांच्या जपणुकीचे धडे दिले.
मुख्याध्यापक सुधाकर घायतडक, सौ. रेखा देशमुख, शाम सावंत, भरत मते यांची उपस्थिती कार्यक्रमाचे सौंदर्य अधिक खुलवणारी ठरली. शाळेची संस्कृती, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे राखी उत्सव ज्ञान, संस्कार आणि प्रेमाचा सुंदर संगम
ठरला.

Post a Comment
0 Comments