Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जालना सायबर पोलिसांची मोठी कामगिरी : व्यापाऱ्याची १ कोटी २९ लाखांची फसवणूक उघड

 


जालना (प्रतिनिधी) :

जालना शहरातील व्यापाऱ्याची तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.

दिनांक २६/०२/२०२५ रोजी तक्रारदार व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे जालना सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. संशयित आरोपींनी खोट्या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून मोठ्या रकमेची फसवणूक केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत, विविध बँक खात्यांमध्ये अडकलेली रक्कम गोठवण्याची कारवाई केली.

सायबर पोलिसांच्या दक्षतेमुळे पीडित व्यापाऱ्यांना परत मिळणाऱ्या रकमेतून १ कोटी २९ लाख रुपये परत मिळाले. ही कामगिरी जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी गुंजन शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक गुंजन शिंदे, पो.उपनिरीक्षक योगेश राऊत, पो.उपनिरीक्षक सुमित पाटोळे, पो.कॉं. श्रीराम चौधरी, पो.कॉं. संदीप मुठे, पो.कॉं. दिलीप सुर्यवंशी आदींचा मोलाचा सहभाग होता.

सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे व्यापारी व नागरिकांनी कौतुक केले असून, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात जालना पोलिसांचे हे यश ठळक मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments