अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड,प्रतिनिधी (दि14/8/25) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विभाजन विभीषीका स्मृतिदिन साजरा करत ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष श्रीपादजी जपे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर घायतडक, प्रमुख पाहुणे प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष श्रीपाद जपे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी, शिशुवाटिका प्रमुख प्रणिताताई वाघमारे उपस्थित होते.
प्रतिमापूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीपाद जपे म्हणाले की
"अखंड भारत" म्हणजे एकसंध आणि अविभाजित भारत, ज्यामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेले प्रदेश पुन्हा एकत्र आणले जातील. या संकल्पनेत, सध्याचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि मालदीव यांचा समावेश आहे. आपण भारतीय 14 ऑगस्ट रोजी "विभाजन विभीषीका" चे स्मरण करतात, कारण आपल्याला असा विश्वास आहे की 14 ऑगस्ट हा भारताच्या विभाजनाचा दिवस आहे आणि हा दिवस भारताच्या ऐक्यासाठी आणि अखंडतेसाठी पुन्हा संकल्प करण्याचा दिवस आहे.
या मध्ये आपल्याला निश्चितच यश येणार आहे.
अध्यक्षीय समारोप मध्ये मुख्याध्यापक सुधाकर घायतडक यांनी आजच्या दिवसभराचे स्वरूप व भव्य तिरंगा रॅली मध्ये आपला सहभाग असल्याचे सांगितले. व बलिदान केलेल्या क्रांतिकारकांचे यावेळी त्यांनी स्मरण केले.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पद्य गायन श्रीम. सुवर्णलता खानापूरकर, पसायदान गायन रेखा देशमुख, सूत्रसंचालन निशा ताई जोशी , आभार प्रदर्शन अनिल चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने व भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments