महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात शेतकरी, महिला व नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
शेती नुकसान भरपाई, पीकविमा, सिंचन, सातबारा दुरुस्ती, वीज पुरवठा यांसह पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, आरोग्य सेवा अशा विविध विषयांवरील तक्रारी मंत्री महोदयांनी काळजीपूर्वक ऐकल्या. काही तक्रारींचा निपटारा तिथेच झाला तर काहींना मुदत देऊन सोडवण्याची हमी देण्यात आली.
“सरकार जनतेसाठी आहे, लोकांचे प्रश्न त्यांच्या दारात जाऊन सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे,” असे मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जनता दरबारात जिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी विभाग अधिकारी, पोलीस प्रशासनासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या थेट संवाद पद्धतीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत, समस्या सोडवण्याचा वेग वाढेल असा विश्वास दर्शविला.



Post a Comment
0 Comments