Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबडमध्ये जालना जिल्हा महसूल सप्ताहाचा भव्य सांगता सोहळा

 


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड प्रतिनिधी – जालना जिल्हा महसूल सप्ताह 2025 चा जिल्हास्तरीय सांगता समारोह अंबड येथे उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, मत्स्योदरी देवस्थान, अंबड येथे आयोजित करण्यात आला होता.

या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती या प्रसंगी माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री आमदार श्री अर्जुनराव खोतकर, आमदार श्री नारायण कुचे, आमदार श्री संतोष पाटील दानवे, माजी आमदार श्री विलास बापू खरात, विभागीय आयुक्त श्री पापळकर, जालना जिल्हाधिकारी सौ. अमिषा मित्तल, जालना मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिनू पी.एम., जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल, उपविभागीय अधिकारी श्री पारदे, अंबड तहसीलदार श्री विजय चव्हाण, घनसावंगी तहसीलदार सौ. मनीषा सोनवणे, गटविकास अधिकारी सौ. ज्योती कवडदेवी, श्री सतीश घाडगे पाटील, अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अवधुत नाना खडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री दिपक ठाकुर, भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य तथा अंबड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री देविदास कुचे, उपनगराध्यक्ष श्री केदार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते शेतकरी, महिला आणि नागरिकांची मोठी उपस्थिती

जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नेते, नगरसेवक, कार्यकर्ते, लाभार्थी शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महसूल विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांना मिळालेल्या लाभांची माहिती देण्यात आली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख केला. तसेच, जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक प्रभावीपणे जनतेच्या सेवेत कार्यरत राहील, असे आश्वासन दिले.

संपूर्ण कार्यक्रम पार पाडताना स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्ट समन्वय साधला.

Post a Comment

0 Comments