Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात क्रांती दिनानिमित्त क्रांती सप्ताहाचे आयोजन

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

-अंबड प्रतिनिधी (दि.9/8/2025) भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान म्हणजे ऑगस्ट क्रांती होय.क्रांती 9 ऑगस्ट १९४२ साली मुंबईच्या गवालिया टँक या मैदानातून झाली होती. त्यामुळेच हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन या नावाने साजरा केला जातो.

कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयांमध्ये क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 या क्रांती दिनाच्या व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून 

 विभाग प्रमुख रागिनीताई जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप जोशी उपस्थित होते.

 भारत मातेचे प्रतिमा पूजन करून क्रांती दिनास सुरुवात करण्यात आली.

 या क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांतीकारकाच्या वेशभूषेमध्ये झाशीची राणी शिवान्या टिंगळे, श्रेया जाधव, गुंजन मस्के ग्रंथराज लबडे, बिरसा मुंडा, तात्याराव टोपे ,आयुष जाधव, स्वातंत्र्यवीर सावरकर अनया भाकरे आदी उपस्थित होते.

 यावेळी क्रांतिकारकांवर विद्यार्थिनी शिवण्या पिंगळे,श्रेया जाधव, आयुष जाधव यांनी भाषणे सादर केली.

 यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी क्रांती दिन सप्ताहाचे आयोजन केल्याचे सांगत पहिले पुष्प- भगतसिंग व बिरसा मुंडा, द्वितीय पुष्प - झाशीची राणी, तिसरे पुष्प - स्वातंत्र्यवीर सावरकर, चौथे पुष्प - लाला लजपतराय, पाचवे पुष्प-डॉ. सुभाष चंद्र बोस, सहावे पुष्प - सरदार वल्लभाई पटेल, सातवे पुष्प - लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित असेल असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या क्रांतिकारकांची वेशभूषा व यांच्यावर भाषण सादरीकरण होणार आहे असे सांगितले.

 क्रांती दिनाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी सर यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांच्यावर मनोगत व्यक्त केले.

 व क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास सर्वांनी अभ्यासावा असा संदेश दिला. सर्व विद्यार्थ्यांनी क्रांती सप्ताह मध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले.

 यावेळी सूत्रसंचालन अनिल चव्हाण, आभार प्रदर्शन योगेश दातीर यांनी केले.

 भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments