अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके:
उद्या होणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त आज अंबड शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शेतकरी वर्ग, बैल मालक, महिला-पुरुष हजारोंच्या संख्येने बाजारात खरेदीसाठी दाखल झाले होते.
बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार. वर्षभर ऊन-पाऊस, वारा-थंडी न जुमानता शेतकरी आणि बैल एकत्र राबत असतात. या नात्याचा मान राखण्यासाठी आणि बैलप्रेमाची जाणीव करून देण्यासाठी शेतकरी वर्षातून एकदा बैलाला सजवतो, त्याला अंघोळ घालतो, गोड-धोड भरवतो आणि डोलबाज सजावटीतून सन्मान देतो. यालाच ‘बैलपोळा’ म्हटले जाते.
बाजारात आज या सणासाठी नवीन दोरी, सजावटीच्या घंटा, गळ्यातील कासव्या, रंगीबेरंगी कपडे, तसेच कृषी अवजारे आणि घरगुती सामानाची खरेदी जोरात झाली. महिलांची खास गर्दी गोडधोड व सणासुदीच्या वस्तू खरेदीसाठी होती.
शहरातील सर्व रस्ते आणि बाजारपेठ सणासुदीच्या वातावरणाने गजबजलेली असून, बैल आणि शेतकरी यांचे अटळ नातेच या पोळा सणातून अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.




Post a Comment
0 Comments