Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबडमध्ये जय हिंद गणेश मंडळाचा जल्लोष

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड शहरात आज जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने गणरायाचे आगमन अत्यंत थाटामाटात व भक्तीभावाने करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळून आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.



गणेश भक्त, महिला, लहान मुले, युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून वातावरण अधिक मंगलमय झाले. या आगमन मिरवणुकीत शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण वातावरण राखले गेले.

गणपती बाप्पाच्या आगमनाने अंबडमध्ये आता दहा दिवस भक्तिमय वातावरणाची सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments