Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पोलीस” बनून लुटले लाखांचे दागिने!




अंबडमध्ये निवृत्त मुख्याध्यापक ठरले भामट्यांचे बळी; भरदिवसा सव्वादोन लाखांचा ऐवज गायब


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड शहरात बुधवारी संध्याकाळी थरारक घटना घडली. दोन तोतया पोलिसांनी मत्स्योदरी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव विठ्ठलराव शिंदे (७२) यांना थांबवून तपासणीच्या नावाखाली तब्बल ₹२.२५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

शिंदे किराणा सामान घेऊन घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, तपासणी सुरू आहे” असे सांगून त्यांनी त्यांच्या खिशातील औषधे, ५०० रुपये रोख, घड्याळ तसेच हातातील अंगठ्या आणि गळ्यातील लॉकेट रुमालात ठेवून गाठ बांधून दिली.

घरी गेल्यावर गाठ उघडली असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सपोनि. अमोल गुर्ले तपास करीत आहेत.

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तोतया पोलिसांच्या कारवायांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment

0 Comments