Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"तेली समाजाचा गर्जना! अंबडमध्ये बावनकुळे यांना ऐतिहासिक निवेदन – बळीराम राऊतांच्या नेतृत्वाखाली समाजाचा हक्काचा लढा उफाळला"

 




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड (प्रतिनिधी) –तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी आघाडीवर राहणारे, सामाजिक कार्यात सदैव झटणारे, समाजातील प्रश्नांना नेहमी प्राधान्य देणारे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज अंबड येथे महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना ऐतिहासिक निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात संताजी जगनाडे महाराज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी तसेच तेली समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी समाजाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार मानण्यात आले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ओबीसी जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय आणि ‘सिंदुर ऑपरेशन’मधील यशस्वी कारवाई याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात ‘श्री संताजी आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करून तेली समाजाला दिलेला सन्मान अधोरेखित करण्यात आला.

निवेदन सादरीकरणावेळी बळीराम राऊत, रमेश भवर, रमेश सोनवणे, बाळू शेठ भवर, योगेश सोनवणे, नारायण दळवे, भगवान मस्के , परमेश्वर मस्के, ईश्वर मसुरे, विनोद खंडागळे, कपिल राऊत, रवींद्र राऊत , ज्ञानेश्वर भवर, विनोद मगर, कैलास हरणे, कपिल राऊत, सुनील राऊत, सोमनाथ राऊत उमेश, उमेश भवर, श्याम गिराम, संतोष सोनवणे, शुभम भवर, कुणाल भिसे, ओमकार भवर, राम शेठ हरणे, सोमनाथ सरफळे, इंद्रजीत गिराम, श्याम गिराम, रघुनाथ राऊत, अनंत राऊत, अवधूत राऊत, परशराम राऊत, गजानन राऊत, यांसह अनेक नामांकित मान्यवर उपस्थित होते.

बळीराम राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे तेली समाजाचे प्रश्न केवळ मांडले जात नाहीत, तर त्यावर ठोस तोडगा निघण्यासाठीही ते झटत आहेत. त्यामुळेच आजचा हा निवेदन सोहळा फक्त एक औपचारिकता नसून समाजाच्या हक्कांचा आणि सन्मानाचा बिगुल ठरला आहे.

Post a Comment

0 Comments