(काकासाहेब कासार, घनसावंगी प्रतिनिधी) :
घनसावंगी तालुक्यातील मौजे राणी उंचेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेने जिल्हास्तरीय कला महोत्सव 2025-26 मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तालुक्याचा मान उंचावला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना आणि एनसीईआरटी यांच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवात “विकसित भारत 2047 मधील भारताची कल्पना” हा मुख्य विषय होता. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्या उपक्रमांतर्गत या कला उत्सवाचे आयोजन 2015-16 पासून होत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असतो.
राणी उंचेगावच्या विद्यार्थ्यांनी दहा कला प्रकारांत दमदार सहभाग नोंदवला.
एकल गायन – श्रद्धा विष्णू सवने
समूह गायन (लोकगीत-गवळण प्रकार) – संभाजी सुधाकर लंके, गोविंद बनकर, पवन खिल्लारे, अजय जाधव
एकल स्वर वाद्य – संजय गुढेकर
एकल तालवाद्य (मृदंग) – संकेत साधू तनवडे
समूह लोकगीत वादन – मयूर बडे, गणेश हुलमुख, हनुमान साळे, सार्थक बेंद्रे
समूह नृत्य (पावली) – सिद्धेश्वर काळे, तुषार वरखडे, यश खेंगटे, सुपेश गिरी
पारंपारिक कथाकथन – गणेश तौर
दृश्यकला – चित्रकला – आरती शिंदे
मूर्तिकाम – रूपाली वारुळे
एकल नकला – जयदीप भिसे
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री. गायके, श्री. प्रदीप शिंदे, डॉ. नूतन मघाडे, तसेच शेळके महाराज यांचा विशेष सहभाग राहिला.
कौतुकाची दाद :
तालुक्यातील एकमेव शाळा म्हणून दहा कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या राणी उंचेगाव प्रशालेचा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. सरूख, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्य. बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी, श्री. आर.पी. टाकले, श्री. कुमावत, श्रीमती प्रेरणा मोरे, ग्रामपंचायत सरपंच रत्नाताई शिंदे, माजी सरपंच विठ्ठल खैरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरे, मुख्याध्यापिका माया कावनकर तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कला महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या लपलेल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाले असून, राणी उंचेगावची प्रशाला तालुक्यातील आदर्श ठरली आहे.

Post a Comment
0 Comments