अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
ओमशांती मा. व उ. मा. विद्यालय शहापूर ता. अंबड जि. जालना येथे विषय गट साधन व्यक्ती श्री पवार ए.ए.गट पंचायत समिती अंबड यांनी भेट दिली असून जालना माध्यमिक शिक्षण विभाग जि. प. जालना व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना अंतर्गत "
मिशन यशस्वी "अंतर्गत चाचणी परीक्षेस भेट दिली.त्यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला,Insprie Award, विद्यार्थी सुरक्षा उपाय - योजना,विज्ञान प्रदर्शन, इको फ्रेन्डली क्लब, विद्यार्थी स्पर्धा परीक्षा या संदर्भात मौलीक मार्गदर्शन केले. उत्तम विद्यार्थी प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला.तसेच झिरपी केंद्र प्रमुख श्री सुंदरराव राऊत यांनी भेट देऊन विद्यार्थी सुरक्षा समिती, एक पेड माँ के नाम, गुणवत्ता, विद्यार्थी उपस्थिती या विषयी मार्गदर्शन केले. परस- बागेतील नारळ, बॉटम पाम,झेंडु इतर वृक्ष पाहून आनंद व्यक्त केला. तसेच शाळेतील शैक्षणिक काम बघून आनंद व्यक्त केला. मुख्याध्यापक शिक्षक वृंदांचे कौतुक करण्यात आले. शाळेचे शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष, गुणवान मुख्याध्यापक नारायण ना-हेडा यांनी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.यावेळी सहशिक्षक राजेंद्र भाडाळकर,अनंत साबळे, जगन्नाथ पिठोरे, प्रकाश बोरे, बप्पासाहेब सुबुगडे, संतोष शिंदे श्रीकांत पाटील, संजय घडलिंग, श्रीमंत बागल, संदीप खरात, विलास तांदळे,बळीराम सौदर, यशवंत पाईकराव, श्रीमती सीता ढेरे आदी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments