Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात नवरात्री व ललित पंचमीच्या निमित्ताने शिशुवाटिका ते चौथीपर्यंतच्या 156 विद्यार्थिनीचे कुमारीका पूजन उत्साही वातावरणात संपन्न

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

(अंबड -) आज कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात नवरात्री व ललित पंचमीच्या निमित्ताने शिशुवाटिका ते चौथीपर्यंतच्या 156 विद्यार्थिनीचे कुमारीका पूजन हे कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न. शिशु वाटिका ते चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींचे कुमारीका पूजनाची सुरुवात माननीय जोशी सरांनी श्लोक म्हणून केली. विद्यार्थिनींना सरळ रांगेत बसून त्यांच्या पुढे सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. मग त्यांचे पाय धुवून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय सौ. ज्योती भाभी ठाकूर ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा श्र. प्रदीप जोशी सर तसेच विद्यासभा संयोजिका श्रीमती रागिनीताई भाले मॅडम व शिशुवाटिका प्रमुख श्रीमती.प्रणिताताई वाघमारे मॅडम व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. सर्वप्रथम वर्गनिहाय इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची पूजन श्रीमती जोशी मॅडम तसेच इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची पूजन श्रीमती. खानापूरकर मॅडम व श्रीमती. वायकोस मॅडम यांनी केले. तसेच शिशु वाटिका विभागातील विद्यार्थ्यांची पूजन श्रीमती. वाघमारे मॅडम श्रीमती. बनसोडे मॅडम व श्रीमती. स्वाती बारहाते यांनी केले. विद्यार्थिनींचे पूजन करताना सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून स्वच्छ कपड्याने पुसून त्यांचे औक्षण करण्यात आले.व त्यांची ओटी मध्ये सर्वांना केळी व दोन पेन देण्यात आले अशाप्रकारे त्यांची ओटी भरण्यात आली. नवरात्रीनिमित्त ५१ पिठाचे दर्शन या ठिकाणी घडले आहे. असे ज्योती भाभी ठाकूर यांनी आपल्या मनोगत मध्ये बोलताना म्हणाले. तसेच सर्व नारीशक्तींचा हाच खरा सन्मान आहे. नवरात्री व ललित पंचमी निमित्त कुमारिका पूजन हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. यासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments