बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
आजच्या काळातील तरुणांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे . वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नका असा हितोपदेश ह. भ. प.साक्षीताई महाराज शिंदे यांनी दिला. त्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील दुर्गा माता उत्सव मंदीरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. या किर्तनात पुढे बोलताना महाराज म्हणाले की, समाजात वावरताना प्रत्येकांने विचार मोठे ठेवावे, आपली हिंदू धर्म संस्कृती जपून ठेवा.भगवंत आपल्याला काही कमी पडू देणार नाही. स्त्री भून हत्या टाळा, मुलींना उच्चशिक्षित बनवा, तरुण हा व्यसनाच्या आहारी भरकटलेला आहे. त्यामुळे वाईट व्यसन करू नका, दोन पैसे कमावून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करा. असा संदेश शेवटी ह. भ. प. साक्षीताई महाराज शिंदे हिने दिला. यावेळी महिला ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments