पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
जालना (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पोलीस मुख्यालय, जालना येथे आज दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी 2000 झाडांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक, गृह विभाग रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग सिद्धार्थ माने, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा रायत्तुवार, राखीव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब वाघ, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन संतोष साबळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक, जालना जयसिंग इंगळे, स्टेनो प्रल्हाद ऐनवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जालना पोलीस अंमलदार संजय सोनवणे, दत्ता पवार तसेच इतर अधिकारी व पोलीस अंमलदार आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाद्वारे पोलीस विभागाने हरित जालना, स्वच्छ जालना या संकल्पनेला बळकटी देत पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक बांधिलकी जपली आहे. जालना पोलीस दलाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments