त्र्यंबकेश्वर येथे साधू संतांच्या बैठकीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला. पार्किंगच्या ठेक्याच्या आडून अवैधरित्या पैशांची वसुली करणाऱ्या गुंडांनी थेट पत्रकारांना लक्ष्य करून मारहाण केली. या घटनेने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी कठोर भूमिका घेत जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभयकुमार यादव यांनी जाहीर इशारा दिला आहे –
“पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ धडा शिकवला पाहिजे. अन्यथा आम्हीही जैसे को तैसा उत्तर देऊ!”
पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याचा पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला असून, पोलिस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
अभयकुमार बलीराम यादव
दैनिक मराठवाडा लोकप्रश्न, जालना
उपाध्यक्ष – जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ

Post a Comment
0 Comments