अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना :जालना जिल्हा पोलिस दलात आपल्या थेट, काटेकोर आणि निडर शैलीसाठी ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी पुन्हा एकदा त्यांच्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारी जगताला हादरवून सोडले आहे. गुन्हेगारांचा पाय रोखण्यासाठी आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी घोडके साहेबांची सिंघम स्टाईल अॅक्शन जनतेत चर्चेचा विषय ठरली आहे.
👉 जनतेच्या तोंडी कौतुकाचे बोल:
“घोडके साहेब मैदानात उतरले की गुन्हेगारांचे मनोधैर्य ढासळते,
सिंघमची गर्जना झाली की गुन्हेगारांना पळता भुई थोडी होते!”
त्यांच्या कारवाईमुळे स्थानिक गुंड, समाजविघातक प्रवृत्ती आणि काळाबाजार करणाऱ्यांचे सगळे डाव उधळले गेले आहेत. “गुन्हेगारांसाठी ते धाकाचे नाव – तर सामान्य जनतेसाठी विश्वासाचा आधार” असे वर्णन नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
👉 धाडस आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक:
संतोष घोडके यांची कार्यशैली म्हणजे निडरपणा, प्रामाणिकता आणि जबाबदारी यांचे उत्तम मिश्रण. ते गुन्ह्याचा माग काढताना नेहमी थेट मार्ग निवडतात. त्यामुळेच त्यांच्या कारवाईला “धडके बाज कारवाई” अशी बिरुदावली मिळाली आहे.
त्यांच्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उज्ज्वल झाली असून, जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आ

Post a Comment
0 Comments