Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

समर्थ सहकारी बँकेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड: समर्थ सहकारी बँकेची 26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा,झवर मंगल कार्यालय,अंबड येथे संपन्न झाली.याप्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री मा.राजेश टोपे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी समर्थ सहकारी बँकेच्या मागील आर्थिक वर्षातील प्रगती,भविष्यातील वाटचाल व उद्दिष्ट या संबंधी बँकेच्या सभासदांशी संवाद साधला.विशेषत: याप्रसंगी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी CO- 265 ऊसाची जात वगळून इतर सर्व ऊस पिकासाठी एकरी 30 हजार ऐवजी 50 हजार रुपये कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस उत्पादनासाठी ठिबक सिंचन व AI तंत्रज्ञानचा वापर केल्यास यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 70% कर्ज बँक उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी बँकेने 20 कोटी रुपयांची स्वतंत्र व्यवस्था केल्याचे देखील त्यांनी सांगितले.


पुढे बोलतांना मा.राजेश टोपे म्हणाले की,समर्थ सहकारी बँकेतून आता सोने तारण कर्ज अधिक,सुलभ,कमी व्याजदरात,सुरक्षित व जलद (एका तासात) देण्यात येणार आहे.तसेच बँकेच्या नवीन शाखांचा विस्तार करण्यात येऊन बँक व्यवसाय वाढवीला जाणार आहे.सभासदांचे हित,ठेवीदांराच्या ठेवीची सुरक्षिता आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यासाठी बँक कायम सेवेत राहणार असून बँकींक क्षेत्रातल्या सर्व अत्याआधुनिक सोयीसुविधा,यांत्रिकरण व तंत्रज्ञान यासाठी समर्थ बँक कायम पुढे रहाणार असल्याचे हे त्यांनी नमुद केले.तसेच नम्रतापूर्वक सेवा व सन्मानपूर्वक सेवा देणारा कर्मचारी हे या बँकेचे वेगळेपण असून दाखल कर्जप्रकरणे प्रलंबित न राहता त्वरीत निकाली काढले जातील याची दक्षाता घेतली जाईल,शेतकऱ्यांच्या मालाला बऱ्याच वेळेस भाव नसतो,अशा वेळी भाव येई पर्यंत गोडाऊनमध्ये ठेवलेल्या कडधान्य व तृणधान्य मालाच्या तारणावर बँक कर्ज देणार आहे.कर्ज घ्या त्याचा योग्य उपयोग करा नियमित परफेड करा व आपली पत जपा (cibil) असे राजेश टोपे यांनी सभादांना आवाहन केले.


यासोबतच यशवंत सहकारी सुतगिरणीची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व यशवंत सहकारी जिनिंग प्रेसिंगची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा पार पडली.


यावेळी उत्तममामा पवार,डॉ.बी.आर.गायकवाड, सतिश टोपे,डॉ.भागवतराव कटारे,मनोजकाका मरकड,सतिष होंडे,संजय कनके,कैलास जिगे,रजियोद्यीन पटेल,सुर्यकांत आर्दड,भास्कर गाढवे,बाळासाहेब पांढरे,ज्ञानदेव सुबुगडे,कल्याण सपाटे,अरुणराव कळकटे,ऍ़ड संजय काळबांडे,विष्णु शेळके,परमेश्वर वाघुंडे,संजय दाड,विजय कनुजे यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ,सभासद,मान्यवर,मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments